शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ऊसदराची कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:51 IST

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत ...

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.हा तोडगा मान्य करून तो कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी इतर जिल्ह्यांनीही त्यानुसारच पहिली उचल द्यावी, असे आवाहन स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. शेट्टी यांनी प्रतिटन ३४०० रुपये, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, तर ‘रयत’चे नेते व कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची पहिली उचल मागितली होती. तिन्ही संघटनांनी यामध्ये लवचिकता दाखविली; पण चर्चेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा, असा पेच निर्माण झालाहोता.शनिवारी खासदार शेट्टी, प्रा. संजय मंडलिक व प्रकाश आवाडे यांची बैठकीच्या माध्यमातून तडजोडीचे पहिले पाऊल पडले. शेतकरी संघटनेची लवचिकता व कारखानदारांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली. बैठकीत निघालेला तोडगा मान्य नसल्याचे व आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेरघुनाथदादा पाटील व अंकूश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी नंतर जाहीर केले.‘एफआरपी’ व ७० : ३० चे दोन कायदे असताना प्रत्येक वर्षी साखर कारखानदारांची अडवणूक योग्य नाही. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड झाली असली तरी अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा ६०० रुपये जादा दिले आहेत. मग हंगामाच्या सुरुवातीलाच खोडा का घालता? अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी केली. यावर हरकत घेत कायद्याची भाषा आता बोलता; मग ‘एफआरपी’ देण्याची ताकद कारखान्यांकडे नव्हती त्यावेळी ‘८० : २०’ हा फॉर्म्युला कोणी आणला? त्यावेळी तुमचा कायदा कोठे गेला होता? आम्ही दोन पावले मागे घेऊन दर मान्य केला. आता साखरेचे दर चांगले असल्याने शेतकºयांना चार पैसे जादा मिळाले तर बिघडले कोठे? अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली. गुजरातमधील कारखाने ४४०० रुपये दर देऊ शकतात. मग तुम्हाला अशक्य का? असे रघुनाथदादा पाटील यांनी विचारले.गुजरातमधील सोळा कारखान्यांचे सोळा दर आहेत. ४४०० रुपये दर देणारा कारखाना सभासदांना किती दराने साखर देतो, किती गाळप होते, हे पाहणे गरजेचे असून, त्या कारखान्याने गतवर्षीच एवढा दर दिल्याचे ‘शाहू’चे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांनी सांगितले.मागील दरात गफलत केल्याचा आरोप ‘अंकुश’ संघटनेने केला. यावर मागील कायद्याप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे, या हंगामावर चर्चा करा, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करून एफआरपी अधिक २०० रुपयांवर तोडगा काढून ऊसदराची कोंडी फोडली.बैठकीस ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री व जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक, के. पी. पाटील, अशोक चराटी, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विजय देवणे, राजीव आवळे, सुरेश पाटील, पी. जी. मेढे, आदींसह संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.पालकमंत्र्यांची शिष्टाई सफलगत हंगामातही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठक बोलाविल्याने ऊसदरातून फारसा संघर्ष न होता तोडगा निघाला होता. यंदाही त्यांनीच पुढाकार घेऊन लाखो शेतकºयांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाची कोंडी फोडली. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे; परंतु आंदोलनामुळे तो ठप्प होता. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास हा तिढा सुटू शकतो, असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :agricultureशेती